श्वान परवाने घेण्याकडे नागरिकांची पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्वान परवाने घेण्याकडे नागरिकांची पाठ
श्वान परवाने घेण्याकडे नागरिकांची पाठ

श्वान परवाने घेण्याकडे नागरिकांची पाठ

sakal_logo
By

वाशी, ता. ११ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात श्र्वानप्रेमींची संख्या मोठी आहे. नेरूळ, सीबीडी, पामबीच रोडवरील वसाहतील जवळपास प्रत्‍येक घरी एकतरी श्र्वान पाळला जातोच. त्यामुळे महापालिकेने श्वानांसाठी काही सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे अनेक श्वानप्रेमी श्वान पाळत असल्याचा परवाना महापालिकेकडून घेण्यात टाळाटाळ करत असल्याचे दिसते. महापालिकेकडे नोंद झालेल्या एकूण श्वानांची संख्या आणि परवाना घेतलेल्यांची संख्या यात मोठी तफावत पाहायला मिळते.
नवी मुंबई महापालिकेकडून पाळीव श्वानांसाठी शहरातील विविध भागात विशेष पेट गार्डन उभारले आहे. त्यांच्या नैसर्गिक विधीच्या सोयीसाठी डॉग पिट तयार आहेत. महापालिका पाळीव, भटक्या प्राण्यांची गणनाही करते. २०१२ मध्ये ही पशूगणना झाली होती. त्यांनतर २०१९ मध्ये पशूगणना करण्यात आली आहे. मात्र त्यांचा अंतिम अहवाल अजून महापालिकेकडे सादर झालेला नाही. २०१२ च्या पशुगणनेनुसार शहरात एकूण ३ हजार ११० पाळीव श्वान आहेत. मात्र महापालिकेकडे केवळ ११९ श्वानप्रेमींनीच श्वान परवाना घेतला आहे.
शहरातील पाळीव श्वानांसाठी महापालिका श्वान परवाना देते. त्यासाठी ठराविक शुल्क आकारते. त्या परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरणही करावे लागते. त्यांचे लसीकरण वेळेवर होत आहे का नाही, यांची तपासणी केली जाते. शहरातील बहुतांश नागरिक सध्या पाळतात, सकाळी-संध्याकाळी त्‍यांना बाहेर फिरण्यासाठी नेतात, मात्र त्‍यापैकी अनेकांकडे श्‍वान पाळण्याचा परवानाच नसतो आणि असला तरी त्‍याचे नूतनीकरण करण्याकडे नागरिक दुर्लक्ष करतात.

श्वानप्रेमी एकदा परवाना घेतला की पुन्हा नूतनीकरणाच्या मागे लागत नाहीत. तर अनेक जण परवाना कशाला घ्यायचा, असा विचार करून दुर्लक्ष करतात. परवान्यांच्या माध्यमातून शहरातील किती नागरिकांकडे श्वान आहेत, हे समजते. त्यामुळे नागरिकांनी आपल्‍या पाळीव श्वानाचा परवाना काढावा.
- श्रीराम पवार, उपआयुक्‍त, नवी मुंबई

परवाना घेतलेले श्वान
नोड पाळीव श्वान परवानाधरक
बेलापूर ५४८- १८
नेरूळ ६९१-१६
वाशी ३१३ -३६
तुर्भे ३००-१७
कोपरखैरणे ४५०-१६
घणसोली २१३-७
ऐरोली ३१४- ७
दिघा २८१-२

एकूण ३११०-११९

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81910 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top