बाल विकास कार्यालयासमोर धरणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाल विकास कार्यालयासमोर धरणे
बाल विकास कार्यालयासमोर धरणे

बाल विकास कार्यालयासमोर धरणे

sakal_logo
By

शहापूर, ता. ११ (बातमीदार) ः दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अंगणवाडी सेविकेच्या भरती प्रक्रियेत आदिवासी उमेदवार महिलांवर अन्याय झाला आहे, असा आरोप करत या महिलांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आवाळे व शेकटपाडा येथील ग्रामस्थ, महिलांनी शहापूर पंचायत समितीच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शहापूर तालुक्यातील शेकटपाडा येथील अंगणवाडीसाठी जवळच असलेल्या मामनोली येथील रुपाली कान्हू वाघ हिने अंगणवाडी सेविका या पदासाठी अर्ज केला होता. या महिलेला मेरिट लिस्टप्रमाणे ७६.२० इतके गुण असताना तिला डावलून अन्य महिलेची नियुक्ती करण्यात आली. तसेच आवाळे येथील सरिता माढा या गेल्या चार वर्षांपासून कोरोना कालावधीतही विनामोबदला अंगणवाडीत काम केले असताना या स्थानिक महिलेला डावलून तेथे दुसऱ्या गावातील महिलेची नियुक्ती केली आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81911 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top