ठाकुर्लीत तरुणाचा मृतदेह सापडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकुर्लीत तरुणाचा मृतदेह सापडला
ठाकुर्लीत तरुणाचा मृतदेह सापडला

ठाकुर्लीत तरुणाचा मृतदेह सापडला

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ११ : ठाकुर्लीतील नवीन हनुमान मंदिराच्या मागील एका इमारतीच्या गटारात एका २९ वर्षीय तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आला. चेतन निकम असे या तरुणाचे नाव असून, तो ठाकुर्ली परिसरातच विजेता सोसायटीत राहत होता. येथीलच एका बांधकाम व्यावसायिकाकडे तो चालकाचे काम करीत होता. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी चेतनचे लग्न झाले होते; तर तीन दिवसांपूर्वी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. इमारतीच्या वाहनतळामध्ये वाहन धुणाऱ्या व्यक्तीला दुर्गंधी येऊ लागल्याने त्याने पाहाणी केली असता गटारात मृतदेह सापडला. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. अधिक तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश सानप यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81912 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top