विमानतळाने पालघरच्या पर्यटनाला चालनाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमानतळाने पालघरच्या पर्यटनाला चालनाच
विमानतळाने पालघरच्या पर्यटनाला चालनाच

विमानतळाने पालघरच्या पर्यटनाला चालनाच

sakal_logo
By

विरार, ता. ११ (बातमीदार) : राजधानी मुंबईच्या विमानतळावरील वाढता प्रवासी भार कमी करण्यासाठी पालघर जिल्ह्यात नवीन ‘सॅटेलाईट’ विमानतळ उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी विमान प्राधिकरणाच्या बैठकीत घेतला. त्यामुळे पालघरवासीयांमधून आनंद व्यक्त होत असताना, लोकप्रतिनिधींनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. विमानतळामुळे निसर्गाचे वरदान लाभलेल्या पालघरच्या पर्यटनाला चालना मिळणार असल्याचा सूर स्थानिक लोकप्रतिनिधींमधून व्यक्त होत आहे.
पालघरमध्ये विमानतळ सुरू झाल्यास त्याचा फायदा येथील नागरिकांनाच होणार आहे; परंतु केवळ विमान सेवा नको तर कार्गो सेवाही सुरू करावी. या सेवेचा लाभ येथील शेतकऱ्यांना होऊ शकेल. पालघर जिल्ह्यात चिकू, जांभूळ, शिमला मिरची आणि साध्या मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. कार्गो सेवेतून ती लवकरात लवकर देशभरात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊ शकेल. त्याचप्रमाणे आदिवासी जिल्हा असल्याने पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी `सकाळ`शी बोलताना व्यक्त केला.
पालघरचे आमदार श्रीनिवास वणगा यांनी याबाबत बोलताना सांगितले, या ठिकाणी बागायती शेतीही मोठ्या प्रमाणात असून, येथील भाजी आणि फळेही देश-विदेशात जात असतात. विमानतळामुळे स्थानिक शेतकऱ्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल. विमानतळाचा फायदा येथील शेतकऱ्यांनाही होणार असून पर्यायाने पर्यटनालाही चालना मिळू शकेल.

सध्या विमानाने जाण्यासाठी मुंबईला जावे लागते. हा एक द्राविडी प्राणायमच असतो. ठिकठिकाणी सुरू असलेले मेट्रोचे काम आणि घोडबंदर येथे होणारी वाहतुकीची कोंडी, याचा नागरिकांना त्रास होतो. पालघरमध्ये विमानतळ झाल्यास त्याचा फायदा नक्कीच जिल्हावासीयांना होणार आहे. फक्त हे विमानतळ पालघर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी व्हावे, ही अपेक्षा.
- विजय पाटील (मानकर), सामाजिक कार्यकर्ते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81913 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top