सीबीडीत पावणे चार लाखांची घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीबीडीत पावणे चार लाखांची घरफोडी
सीबीडीत पावणे चार लाखांची घरफोडी

सीबीडीत पावणे चार लाखांची घरफोडी

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर): कोकण भ्रमंती करण्यासाठी गेलेल्या सीबीडी सेक्टर-८ मधील एका कुटुंबाचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यांच्या घरातील तब्बल ३ लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. सीबीडी पोलिसांनी या प्रकरणातील घरफोडीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
सीबीडी सेक्टर-८ मधील गिरीकुंज सोसायटीत राहणारे सुधीर अभ्यंकर (७३) हे ४ मे रोजी पत्नीसह कोकण भ्रमंतीसाठी गेले होते. यादरम्यान अभ्यंकर यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील कपाटात आजारपणाच्या खर्चासाठी ठेवलेली अडीच लाखांची रोख रक्कम, तसेच प्रत्येकी ७५० ग्रॅम वजनाची चांदीची ४ बिस्किटे असा सुमारे ३ लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ८ मे रोजी रात्री ११ वाजण्‍याच्या सुमारास अभ्यंकर दाम्पत्य घरी परतले असता, घरामध्ये चोरी झाल्याचे व त्यांच्या घरातील रोख रक्कम तसेच चांदीची बिस्किटे चोरून नेण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी सीबीडी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81929 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top