एलईडी हॅलोजनची त्रिकुटाकडून चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एलईडी हॅलोजनची त्रिकुटाकडून चोरी
एलईडी हॅलोजनची त्रिकुटाकडून चोरी

एलईडी हॅलोजनची त्रिकुटाकडून चोरी

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : तुर्भे स्टोअर्समधील अहिल्याबाई होळकर रुग्णालयाच्या परिसरातील एलईडी हॅलोजन त्रिकुटाने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. त्या भागात लावण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यात तिघे चोरटे कैद झाले आहेत. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई महापालिकेने शहर सुशोभीकरणातंर्गत तुर्भे स्टोअर्समधील अहिल्याबाई होळकर रुग्णालयाच्या आवारात पाण्याचे कारंजे लावले आहेत. सदर ठिकाणी महापालिकेकडून एलईडी हॅलोजन लावण्यात आले होते. ७ मे रोजी रात्री येथील हॅलोजन बंद करण्यात आले असताना, त्याच भागातील तिघा चोरट्यांनी सदरचे हॅलोजन चोरून नेले. हा प्रकार सकाळी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर रुग्णालय आवारातील सीसी टीव्ही फुटेजची तपासणी केली असता, तिघा चोरट्यांनी हॅलोजन चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

चोरट्यांचा शोध सुरू
रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी या चोरट्यांविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून चोरीचे सीसी टीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. त्यांची नावे विवेक जयस्वाल, आशीष जयस्वाल आणि अनिकेत चौरासिया असून ते तुर्भे स्टोअर्समध्ये राहण्यास असून सदर चोरट्यांचा शोध सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81930 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top