एक्सप्रेस आणि फलाटात सापडणाऱ्या महिलेचे रेल्वे पोलिसांनी वाचविले प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक्सप्रेस आणि फलाटात सापडणाऱ्या महिलेचे रेल्वे पोलिसांनी वाचविले प्राण
एक्सप्रेस आणि फलाटात सापडणाऱ्या महिलेचे रेल्वे पोलिसांनी वाचविले प्राण

एक्सप्रेस आणि फलाटात सापडणाऱ्या महिलेचे रेल्वे पोलिसांनी वाचविले प्राण

sakal_logo
By

एक्सप्रेस आणि फलाटात सापडणाऱ्या महिलेचे रेल्वे पोलिसांनी वाचविले प्राण
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : पती गाडीतून उतरलेच नसल्याने महिलेने धावती एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न केला. गाडी पकडण्याच्या नादात महिलेचा तोल गेला. ती महिला फलाट आणि एक्स्प्रेसमध्ये सापडणार तेवढ्यात प्रसंगावधान राखत रेल्वे पोलिसांनी त्यांना बाहेर खेचून त्यांचे प्राण वाचविले. ही घटना कल्याण रेल्वेस्थानकात मंगळवारी सकाळी १० वाजण्‍याच्या सुमारास घडली.
कल्याण रेल्वेस्थानकात दुरांतो एक्स्प्रेस फलाट क्रमांक पाचवर आली. सीएसएमटी स्टेशनपर्यंत जाणारी ही गाडी असून तेच स्टेशन आले, असा समज प्रवासी महिला नंद राम मौर्या यांचा झाल्याने त्या कल्याण रेल्वेस्थानकात उतरल्या. मात्र आपल्यासोबत आपले पती गाडीतून उतरले नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. यामुळे त्यांनी पुन्हा धावत्‍या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला असता त्‍यांचा तोल गेला. यावेळी खाली पडल्याने त्या गाडी आणि फलाटाच्या मध्ये सापडणार तोच कर्तव्यावर असलेले महिला सहा. पोलिस फौजदार डोमाडे, पोलिस नाईक गव्हाणे, काटकर यांनी तत्काळ महिलेला बाहेर खेचत त्यांचा जीव वाचविला. तेवढ्यात गाडीतील एका प्रवाशाने चेन खेचून गाडी थांबविली. रेल्वे पोलिसांनी महिला प्रवासी आणि तिच्या पतीची भेट घडवून देत त्यांना त्याच गाडीतून सीएसएमटीकडे रवाना केले. यावेळी पती-पत्नीने पोलिसांचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81931 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top