तुर्भे माता-बाल रुग्णालयात प्रसूती विभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुर्भे माता-बाल रुग्णालयात प्रसूती विभाग
तुर्भे माता-बाल रुग्णालयात प्रसूती विभाग

तुर्भे माता-बाल रुग्णालयात प्रसूती विभाग

sakal_logo
By

वाशी, ता. ११ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील माता-बाल रुग्णालयात १५ मेपासून आंतररुग्ण सेवांसह प्रसूती विभागही सुरू केला जात आहे. आतापर्यंत या रुग्णालयात गर्भवती महिलांसाठी केवळ बाह्यरुग्ण सेवा सुरू होती. मात्र प्रसूतीसाठी त्यांना वाशी किंवा नेरूळ रुग्णालयात जावे लागत होते. मात्र आता येथे प्रसूती विभागासह मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांच्या उपचारासाठी एनआयसीयू विभागही उभारला जात आहे. त्यामुळे तुर्भे आणि सानपाडा परिसरातील गर्भवती महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महापालिकेच्या वतीने सुरुवातीपासूनच मुख्य रुग्णालयांसह विभागनिहाय माता-बाल रुग्णालयांची उभारणी करण्यात आली आहे. कोपरखैरणे आणि तुर्भे या ठिकाणी राहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी प्राधान्याने ही रुग्णालये उभारण्यात आली होती. मात्र कालांतराने या रुग्णालयांच्या इमारतींची अवस्था जीर्ण झाल्याने रुग्णालयातील सेवा स्थगित करण्यात आल्या. त्यामुळे या परिसरातील गर्भवती महिलांना वेगवेगळ्या तपासण्यांसाठी वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयातच धाव घ्यावी लागत होती.

कोपरखैरणे येथे माता-बाल रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन नुकतेच झाले असून कामालाही सुरुवात झाली आहे. तुर्भे येथील माता-बाल रुग्णालयाच्या इमारतीची डागडुजी केल्यानंतर ही इमारत वापरण्यासाठी पुन्हा तयार करण्यात आली. त्यानुसार मार्च २०२१ पासून या ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. येथे गर्भवती महिलांना प्रसूतिपूर्व मार्गदर्शन, उपचार आणि चाचण्या केल्या जात होत्या. सोनोग्राफीची सुविधाही आहे. मात्र प्रसूती विभाग कार्यरत नव्हता.

प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलांना तुर्भे ओलांडून नेरूळ किंवा वाशी गाठताना दमछाक होत होती. त्यामुळे तुर्भे येथील रुग्णालयात प्रसूतीची व्यवस्था करावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार आता या ठिकाणी विशेष प्रसूती विभाग उभारण्यात आला आहे. येथे ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब, गरजू महिलांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक
सध्या प्रसूती विभाग सुरू करण्यासाठी दोन स्त्री-रोगतज्ज्ञ, २० अन्य कर्मचारी, एक बालचिकित्सक, भूलतज्ज्ञाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सध्या दररोज ४० ते ५० महिला ओपीडीमध्ये येऊन तपासण्या, तर १५ ते २० सोनोग्राफी होत असतात. यापुढे ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. नवजात, उपचाराची गरज असणाऱ्या बाळांसाठी पाच खाटांचा एनआयसीयू विभागही सुरू केला जाणार आहे.
- डॉ. उदय खराडे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81934 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top