आरोग्य विभागाला फेरीवाल्यांचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य विभागाला फेरीवाल्यांचा विळखा
आरोग्य विभागाला फेरीवाल्यांचा विळखा

आरोग्य विभागाला फेरीवाल्यांचा विळखा

sakal_logo
By

ठाणे, ता. ११ ः ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या इमारतीच्या परिसरात विद्युत ट्रान्सफार्मरमध्ये शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. मात्र, या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने अनुचित प्रकार टळला. असे असले तरी, आरोग्य विभागाच्या इमारतीला फेरीवाल्यांनी घातलेला विळखा, त्यात सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यादेखतच याच विद्युत ट्रान्सफार्मर रूममध्ये फेरीवाले पालिकेच्या कारवाईपासून बचाव व्हावा यासाठी आपले समान ठेवत आहेत. त्यामुळे हा रूम फेरीवाल्यांच्या सामानाचा जणू अड्डाच बनला आहे.
ठाणे शहराच्या मुख्य बाजारपेठेत जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसह त्याच्या शेजारी आरोग्य विभागाची इमारत, तसेच जिल्हा परिषदेची कन्या शाळा आहे. याच परिसरात आरोग्य विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेटच्या बाजूलाच विद्युत विभागाचा ट्रान्सफार्मर रूम आहे. मात्र, या खोलीमध्ये गेटच्या बाहेर बसणाऱ्या फेरीवाल्यांनी बेकायदेशीररीत्या आपले साहित्य व सामान ठेवण्याचा अड्डा तयार केला आहे. अनेकदा या फेरीवाल्यांना समज देऊनही हे फेरीवाले प्रशासनाला दाद देत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच मंगळवारी सकाळी अचानक विद्युत ट्रान्सफार्मर रूममध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागाचा वीजपुरवठा तीन ते चार तास खंडित करण्यात आला होता. त्यामुळे विभागाचे काम रखडले होते. विद्युत डीपीमध्ये फेरीवाल्यांनी साहित्य ठेवू नये यासाठी विद्युत विभागाकडून अनेकदा त्या बॅाक्सला टाळे लावण्यात आले होते. फेरीवाले टाळे तोडून आपले साहित्य यात ठेवत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली; तर आरोग्य विभागाच्या इमारतीच्या गेटवर असलेल्या ऊस रसाच्या विक्रेत्याकडून याच रूममध्ये उसाचा साठा करून ठेवण्यात येत असल्याचे देखील दिसून येत आहे.

प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष
आरोग्य विभाग बाजारपेठेच्या परिसरात येत असल्यामुळे या भागात नेहमीच फेरीवाल्यांचा वावर असतो. या फेरीवाल्यांमुळे आरोग्य विभागाच्या इमारतीत येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कन्याशाळेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची व शिक्षकांची वाट फेरीवाल्याकडून अडवली जात आहे. हे फेरीवाले बेकायदेशीरपणे आपले बस्तान मांडून याठिकाणी बसलेले असतात. तसेच सुट्टीच्या दिवशीही जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर हे फेरीवाले बिन्धास्तपणे आपले विक्रीचे साहित्य घेऊन याठिकाणी व्यवसाय करत असतात. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असून मात्र, मंगळवारच्या घटनेने आतातरी जिल्हा परिषद प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81936 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top