रुसून माहेरी गेलेल्या बायकोला आणण्यासाठी गाडीची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुसून माहेरी गेलेल्या बायकोला आणण्यासाठी गाडीची चोरी
रुसून माहेरी गेलेल्या बायकोला आणण्यासाठी गाडीची चोरी

रुसून माहेरी गेलेल्या बायकोला आणण्यासाठी गाडीची चोरी

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ११ ः रुसून माहेरी गेलेली बायको काही केल्या परतत नव्हती. अखेर तिला आणण्यासाठी त्याने चक्क मालकाची बोलेरो गाडीच चोरी केली. बायको तर आली नाही, परंतु त्याला जेलची हवा मात्र खावी लागली आहे. रतन उर्फ जितू मासरे (वय ४३) असे गाडी चोरी करणाऱ्याचे नाव आहे. चार महिन्यांपासून विष्णूनगर पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला नाशिक येऊन अटक करण्यात आली आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील सुदर्शन नगर येथे राहणारे अमिर शेळके या हॉटेल व्यावसायिकाची गाडी रेतीबंदर रोड, मोठागाव येथून तीन जानेवारीला रात्री चोरीस गेली होती. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला असता त्यांच्याकडे काम करणारा रतन उर्फ जितू मासरे हा देखील तेव्हापासून बेपत्ता असल्याचे समोर आले होते. विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेंद्र पाटणकर, पोलिस शिपाई कुंदन भामरे यांनी शोध घेतला असता महिनाभराच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव बोलेरो गाडी बेवारस स्थितीत आढळून आली; परंतु नोकर जितू हा आढळून आला नव्हता. पोलिस त्याच्या मागावर असता तो सतत नाशिक, जळगाव, चाळीसगाव असे आपले ठिकाण बदलत होता. अखेर चार महिन्यांनंतर नाशिक येथे जितू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तत्काळ नाशिकला रवाना होत, सापळा रचत जितूला अटक केली आहे.
कोट...
जितू याने बायकोला आणण्यासाठी मालकाची गाडी चोरी केली. मात्र, बायको तरीही परत न आल्याने त्याने गाडी तेथेच सोडून पळ काढला. आपण पकडले जाऊ, या भीतीने तो सतत चार महिने आपले ठिकाण बदलत होता; परंतु तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी त्याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत.
- पंढरीनाथ भालेराव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81939 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top