शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही
शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही

शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही

sakal_logo
By

घणसोली, ता. ११ (बातमीदार) : उत्तम व्यवस्थापन होण्याकरिता प्रशिक्षित व्यवस्थापक असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने राज्यातील महासंघाने सर्वसमावेशक अभ्यासक्रम तयार करून व्यवस्थापक तयार करावे, असे परिपत्रक १५ मार्च २०१० रोजी सहकार आयुक्त निबंधक व सहकारी संस्था यांनी काढले होते. प्रत्येक व्यक्तीकडे दूरदृष्टी असली पाहिजे आणि त्यांनी एकाच गोष्टीवर न थांबता अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी किंवा प्रशिक्षण घेताना वयाचे बंधन असता कामा नये, असे नवी मुंबई को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनचे सचिव भास्कर म्हात्रे यांनी सांगितले. नवी मुंबई को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन लिमिटेड संस्थेच्या १२ व्या तुकडीचा गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन शिक्षणक्रमाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा ८ मे रोजी भार्गव प्रशिक्षण केंद्र, सीबीडी बेलापूर येथे उद्योजक भार्गव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81941 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top