गाडीच्या सायलेन्सरची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाडीच्या सायलेन्सरची चोरी
गाडीच्या सायलेन्सरची चोरी

गाडीच्या सायलेन्सरची चोरी

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ११ (वार्ताहर) : एका चारचाकी वाहनाच्या सायलेन्सरची चोरी झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील केळवणे गावाच्या हद्दीत घडली आहे. प्रवचन शेडगे यांनी नवीन चार चाकी गाडी खरेदी केली होती. त्या गाडीचा अचानक आवाज येऊ लागल्याने ती गाडी गॅरेजमध्ये दाखवली असता गॅरेजवाल्याने गाडीला सायलेन्सरच नसल्याचे सांगितले. केळवणे गावाच्या बस स्टॉपजवळून अज्ञात चोरट्याने सदर गाडीचा सायलेन्सर चोरल्याचे प्राथमिक तपासात माहिती मिळाली आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार देण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81944 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top