खारघरमध्ये कोरोना रुग्णांत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरमध्ये कोरोना रुग्णांत वाढ
खारघरमध्ये कोरोना रुग्णांत वाढ

खारघरमध्ये कोरोना रुग्णांत वाढ

sakal_logo
By

खारघर, ता. ११ (बातमीदार) : खारघरमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तीन दिवसात शहरात आठ कोरोना बाधित आढळले असून नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन पनवेल महापालिकेकडून करण्यात आले आहे.
खारघर हा पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्वात मोठा नोड आहे. दोन वर्षात शहरातील कोरोना बाधितांचा आकडा ३० हजार ३६८ इतका झाला आहे. आतापर्यंत ३० हजार ८१ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. तर २७१ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
सद्यस्थितीत शहरात १६ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहे. महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक कोरोना बाधित खारघरमध्ये आढळले आहेत. गेल्‍या तीन दिवसात खारघरमध्ये आठ रुग्‍णांची नोंद झाली आहे.
८ मे- १
९ मे - २
१० मे -५

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81948 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top