२०० युनिट मोफत वीज आणि पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२०० युनिट मोफत वीज आणि पाणी
२०० युनिट मोफत वीज आणि पाणी

२०० युनिट मोफत वीज आणि पाणी

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : आम आदमी पार्टीने (आप) आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व २३६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दहा वर्षांपासून ‘आप’ने मुंबईकरांच्या विविध विषयांवर लढा दिला आहे. आता महापालिकेच्या सर्व २३६ जागा लढवत मुंबईकरांना २०० युनिटपर्यंत मोफत वीज आणि मोफत पाणीपुरवठा करणार असल्याचे ‘आप’च्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन यांनी सांगितले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
मुंबईसह राज्यात आम आदमी पक्षाने मुख्यत्वेकरून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर काम केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अजित पवार यांचा सिंचन घोटाळा, छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांचा घोटाळा ‘आप’ने उघडकीस आणला. त्याचवेळी मुंबईकरांना भेडसावणाऱ्या विविध विषयांमध्येही पुढाकार घेतला आहे. त्यात प्रामुख्याने एसआरए तसेच सिद्धार्थ नगरच्या विषयावर आवाज उठवला आहे. नजीकच्या काळातही मुंबईकरांच्या झोपड्या आणि विजेच्या मुद्द्यावर भर देणार आहोत. तसेच रस्त्यावरील खड्डे, टोल, शौचालय, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य विषयांवरही येत्या काळात आम्ही काम करणार आहोत. मुंबईकरांच्या विविध विषयांवर आम्ही काम केले असल्यानेच येत्या निवडणुकीत मुंबईकर आम्हाला मतदान करतील, असेही मेनन यांनी सांगितले.
---
ओबीसी आरक्षणाला पाठिंबा
ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या सर्वच पक्षांनी बेजबाबदार वर्तवणूक केली आहे. ओबीसींना मदत करण्याचा कोणत्याही पक्षाचा हेतू नसल्याने ओबीसी आरक्षण रखडल्याचे मेनन यांनी सांगितले. आगामी महापालिका निवडणुका ओबीसी आरणाशिवाय घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81956 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top