तेलवाहू जहाज डीजी शिपिंग विभागाच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेलवाहू जहाज डीजी शिपिंग विभागाच्या ताब्यात
तेलवाहू जहाज डीजी शिपिंग विभागाच्या ताब्यात

तेलवाहू जहाज डीजी शिपिंग विभागाच्या ताब्यात

sakal_logo
By

उरण, ता. ११ (वार्ताहर) : रासायनिक द्रव्यांची वाहतूक करताना कोणतीही दक्षता न घेता सागरी प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जेएनपीटी बंदरात दाखल झालेल्या ‘ग्लोबल जेनेसिस’ हे तेलवाहू जहाज डीजी शिपिंग विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
घातक रसायनाने भरलेले अग्रवाल शिप ग्रुपचे ‘ग्लोबल जेनेसिस’ हे तेलवाहू जहाज जेएनपीटी बंदरात दाखल झाले होते. चार दिवसांपूर्वी बंदरात दाखल झालेल्या रसायन भरलेल्या तेलवाहू जहाजात ओलावा मिक्सिंगने भरलेले उत्पादन दोषपूर्ण असल्याचे दिसून आले. घातक रसायनाच्या गळतीची कोणत्याही प्रकारची काळजी घेतलेली नव्हती. यामुळे समुद्रात रसायन मिसळून जलप्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर डीजी शिपिंग विभागाने ताब्यात घेऊन चौकशी सुरुवात केली आहे.
या दरम्यान या तेलवाहू जहाजातील तेल गळतीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन हे जहाज जेएनपीटी बंदरातून दूरवर हलविण्यात आले असून, न्हावा येथील ओएनजीसीच्या जेट्टी समोरील ॲंकर पॉईंटवर नांगरून ठेवण्यात आले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि एनओसी अहवाल प्राप्‍त होईपर्यंत जहाजाला सोडण्यात येणार नसल्याची माहिती जेएनपीटीच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
नियमानुसार संपूर्ण तपासणी
जेएनपीटी बंदरात दाखल झालेल्या ‘ग्लोबल जेनेसिस’ या तेलवाहू जहाजाची ‘पोर्ट स्टेट इन्स्पेक्शन’ नियमानुसार संपूर्ण तपासणी करून चौकशी केली जाणार असल्याची माहिती डीजी शिपिंग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81957 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top