दुसऱ्यांच्या जीवावर सभा करणाऱ्यांनी टीका करू नये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्यांच्या जीवावर सभा करणाऱ्यांनी टीका करू नये
दुसऱ्यांच्या जीवावर सभा करणाऱ्यांनी टीका करू नये

दुसऱ्यांच्या जीवावर सभा करणाऱ्यांनी टीका करू नये

sakal_logo
By

कल्याण, ता. ११ (बातमीदार) : ज्यांच्या सभाच दुसऱ्यांच्या जीवावर चालतात त्यांनी टीका करू नये. संभाजीनगरच्या सभेसाठी कोणी फंडिंग केले, कोठून माणसे आली याची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. यामुळे मनसेचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा पलटवार शिवसेना प्रवक्त्‍या मनीषा कायंदे यांनी केला. आरोप करणे सोपे आहे, मात्र काम करून दाखवले पाहिजे आणि शिवसेना हा काम करणारा पक्ष असल्याचा टोला त्यांनी यावेळी आमदार राजू पाटील यांना लगावला.
कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात राज्य महिला आयोगाच्या समितीच्या सदस्यांनी पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी समिती प्रमुख सरोज अहिरे, मनीषा कायंदे, गीता जैन, सुमन पाटील, मंजुळा गावित यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेत महिला बालकल्याण समितीच्या वतीने सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यानंतर शिवसेना प्रवक्त्‍या आमदार मनीषा कायंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत मनसेच्या आरोपांना प्रतिउत्तर दिले.
पालकमंत्र्यांचे जिल्ह्यावर पूर्ण लक्ष
डोंबिवलीजवळील देसलेपाडाजवळील खदानीत ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर चित्रपट प्रमोशनमधून वेळ काढा, असे पत्र मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले होते. त्याचा समाचार घेत घटना दुर्दैवी आहे, पण सध्या सर्वत्रच पाणीटंचाईच्या झळा बसत असून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच पालकमंत्र्यांचे जिल्ह्यावर पूर्ण लक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.
मनसेला चोख प्रत्‍युत्तर
मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेच्या होऊ घातलेल्या सभेच्या टीझरवर टीका करताना शिवसेनेला चोर सेना असे संबोधले होते. याबाबत कायंदे यांनी समाचार घेतला. ज्यांच्या सभाच दुसऱ्यांच्या जीवावर चालतात त्यांनी इतरांवर टीका करू नये. वारंवार मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राची सुरू असलेली बदनामी शिवसैनिक खपवून घेणार नाही, असा इशारादेखील कायंदे यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81961 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top