बुध्दपौर्णिमेदिवशी स्वच्छतादुतांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुध्दपौर्णिमेदिवशी स्वच्छतादुतांचा गौरव
बुध्दपौर्णिमेदिवशी स्वच्छतादुतांचा गौरव

बुध्दपौर्णिमेदिवशी स्वच्छतादुतांचा गौरव

sakal_logo
By

पनवेल, ता. ११ (प्रतिनिधी) : बुद्धपौर्णिमेनिमित्त पालिका प्रशासनामार्फत स्वच्छतादूतांचा गौरव सोहळा १६ मे रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी दिली. या कार्यक्रमात पालिकेमार्फत घेण्यात आलेल्या टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धा, स्वच्छ सर्वेक्षण २०२२ स्पर्धा, भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंती उत्सवावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे.

महापौरांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियानांतर्गत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आली होती. या अंतर्गत एक दिवसीय प्रदर्शन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भरविण्यात आले होते. पनवेल महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२२ करिता आयोजित स्वच्छ सोसायटी, स्वच्छ हॉस्पिटल, स्वच्छ हॉटेल, स्वच्छ शाळा, स्वच्छ शासकीय संस्था या स्पर्धांच्या बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. कविता चौतमोल यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81967 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top