
`मुंबई यंदा तुंबणारच`
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ - मुंबई महानगरपालिकेने दाखवेली नालेसफाईची आकडेवारी खोटी आहे. तसेच मिठी नदी ८० टक्के साफ केल्याचा दावाही खोटा आहे. अनेक ठिकाणी पालिकेचे नालेसफाईचे काम धीम्या गतीने सुरू असल्याचे पालिकेनेच कबूल केले आहे. तर अनेक ठिकाणी पालिका अधिकारी, कंत्राटदार आणि नगरसेवक यांचे भ्रष्टाचाराचे कनेक्शन असल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. पालिकेच्या नाकर्तेपणामुळे मुंबई तुंबणारच, असा आरोप आपच्या प्रीती मेनन यांनी केला आहे. पाणी तुंबणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत मुंबईतील नालेसफाईचे (मंगळवार, १० एप्रिल) छायाचित्र आपकडून दाखवण्यात आले. त्यामध्ये भारत नगर, (वांद्रे), पोईसर, ओशिवरा, गोरेगाव, गोवंडी, भांडुप या ठिकाणी कोणतीही नालेसफाई झालेली नसल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळेच या ठिकाणी यंदाच्या पावसाळ्यातही पाणी तुंबणार असल्याच्या त्या म्हणाल्या. अनेक ठिकाणी नाल्यातील कचरा तसाच दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पालिकेची आकडेवारी फोल असल्याचेही आपने म्हटले आहे. त्यामुळे या नालेसफाईच्या कामात हातमिळवणी करणाऱ्या कंत्राटदार, महापालिका अधिकारी आणि नगरसेवक यांच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मेनन यांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81969 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..