प्रभाग रचनेवर ‘वंचित’ची नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभाग रचनेवर ‘वंचित’ची नाराजी
प्रभाग रचनेवर ‘वंचित’ची नाराजी

प्रभाग रचनेवर ‘वंचित’ची नाराजी

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ११ (बातमीदार ) ः अंबरनाथ नगरपालिकेच्या नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या कार्यक्रमावर वंचित बहुजन आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला आहे. जुनीच प्रभाग रचना रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत सुधारित प्रभाग रचना सादर न केल्यास आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला आहे. याआधी १० मार्च २०२२ रोजी अंबरनाथ पालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला होता. हरकती सूचना सादर होऊन सुनावणी होण्यापूर्वीच प्रभाग रचना जाहीर करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारकडे गेले. त्यामुळे पुन्हा परिस्थिती जैसे थे होती, असे वंचिततर्फे प्रवीण गोसावी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81970 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top