कल्याणमधील काही भागात आज वीजपुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमधील काही भागात आज वीजपुरवठा बंद
कल्याणमधील काही भागात आज वीजपुरवठा बंद

कल्याणमधील काही भागात आज वीजपुरवठा बंद

sakal_logo
By

कल्याण, ता.११ (बातमीदार) ः वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित व पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिम विभागातील काही भागांचा वीजपुरवठा गुरुवारी काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. कल्याण पश्चिममधील २२ केव्ही दुर्गाडी उपकेंद्रातून निघणाऱ्या आधारवाडी फिडरवरील सोनावणे कॉलेज, वाडेकर सर्कल, साईबाबा मंदिर, अन्नपूर्णा नगर, जेल रोड, सहजानंद चौक फिडरवरील मोहिंदरसिंग काबुलसिंग, ठाणकरपाडा, दुर्गानगर, मानससरोवर, सुंदरनगर, महाराष्ट्र नगर, आग्रा रोड फिडरवरील आग्रा रोड, भारताचार्य चौक, लाल चौकी, पारनाका, नमस्कार मंडळ, बंदर रोड फिडरवरील रेतीबंदर, मिठबंदर, व्हाईट हाऊस, मौलवी कंपाऊंड, गोविंदवाडी, कोलीवाडा आदी भागांचा वीजपुरवठा गुरुवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित भागाचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात इतर वाहिन्यांवरून सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे; तर वाडेघर फिडरवरील आनंदसागर, डीबी चौक, श्री कॉम्लेक्स मेहरनगर, डॉन बॉस्को शाळा, वाडेघर, साई शरण आदी भागांचा वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81971 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top