
पूर्व उपनगरात १८ मे रोजी पाणीकपात
मुंबई, ता. ११ ः मुंबई महापालिकेतर्फे पूर्व उपनगरातील ‘एन’ विभागातील सोमय्या नाल्याखालून सूक्ष्मबोगदा (मायक्रोटनेलिंग) पद्धतीने जलवाहिन्यांचे काम केले जाणार आहे. त्यामुळे बुधवारी (ता.१८) सकाळी १० वाजेपासून गुरुवारी (ता.१९) सकाळी १० वाजेपर्यंत पूर्व उपनगरांतील काही भागात पाणीपुरवठा बंद राहील. तसेच शहरातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने जाहीर केली आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
---
कुठे होईल पाणीकपात?
१. एल पूर्व विभाग ः राहुल नगर, एडवर्ड नगर, पानबजार, व्ही. एन. पूरव मार्ग, नेहरू नगरच्या दोन्ही बाजू, जागृती नगर, शिवसृष्टी नगर, एस. जी. बर्वे मार्ग, कसाईवाडा पम्पिंग, हिल मार्ग, चाफे गल्ली, चुनाभट्टी पम्पिंग स्वदेशी मिल मार्ग.
२) ‘एन’ विभाग ः राजावाडीचे सर्व क्षेत्र, चित्तरंजन नगर वसाहत, आंबेडकर नगर, नीळकंठ व्हॅली, राजावाडी रुग्णालय परिसर, विद्याविहार स्थानक पूर्वेकडील रस्ता, ओएनजीसी वसाहत मोहन नगर, कुर्ला टर्मिनल मार्ग, ओघड भाई रस्ता, आनंदी रस्ता रामजी, आशर रस्ता.
३) ‘एम पश्चिम’ विभाग ः टिळक नगर सर्व क्षेत्र, ठक्कर बाप्पा वसाहत, वत्सलाताई नगर, सहकार नगर, आदर्श नगर, राजा मिलिंद नगर, राजीव गांधी नगर, गोदरेज आवार, कुटीरमंडल, सम्राट अशोक नगर.
४) ‘एफ उत्तर’ विभाग ः वडाला ट्रक टर्मिनल, न्यू कफ परेड, प्रतीक्षा नगर, पंचशील नगर, शीव पूर्व आणि पश्चिम, सायन कोळीवाडा, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, सरदार नगर, इंदिरा नगर, वडाला मोनोरेल डेपो.
५) ‘एफ दक्षिण’ विभाग ः दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातनकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणे मार्ग, हिंदमाता, परळ, लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81974 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..