मानहानी खटल्‍याची सुनावणी १८ रोजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानहानी खटल्‍याची सुनावणी १८ रोजी
मानहानी खटल्‍याची सुनावणी १८ रोजी

मानहानी खटल्‍याची सुनावणी १८ रोजी

sakal_logo
By

भिवंडी, ता.११ (बातमीदार) : आरएसएसची बदनामी केल्याप्रकरणी भिवंडी न्यायालयात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल मानहानी खटल्याची पुढील सुनावणी १८ जून रोजी भिवंडीत होणार असल्याची माहिती राहुल गांधी यांचे वकील ॲड. नारायण अय्यर यांनी दिली आहे.
मार्च २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीतील सोनाळे गांव येथे झालेल्या प्रचारसभेत खासदार राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचे विधान केल्याप्रकरणी भिवंडीतील आरएसएस कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यामुळे आज भिवंडी न्यायालयामध्ये राहुल गांधी यांची मानहानीबाबत सुनावणी सुरू आहे. राहुल यांच्याविरोधात याचिका दाखल करणारे राजेश कुंटे यांना सुनावणीस विलंब लावीत असल्याने सतत दोन तारखांना अनुपस्थित राहिल्याने त्यांना एकूण १५०० रुपये दंड ठोठावल्याने १० मे च्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु या वेळीही फिर्यादी यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे गैरहजर राहण्याचा अर्ज केला, तर अॅड. अय्यर यांनी राहुल गांधी यांचा कायम गैरहजर राहण्याचा अर्ज न्यायालयासमोर सादर केला. या अर्जावर येत्या १८ जून रोजी न्यायालय आदेश देणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81978 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top