राजकीय षडयंत्रातून गुन्हा दाखल : गणेश नाईक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय षडयंत्रातून गुन्हा दाखल : गणेश नाईक
राजकीय षडयंत्रातून गुन्हा दाखल : गणेश नाईक

राजकीय षडयंत्रातून गुन्हा दाखल : गणेश नाईक

sakal_logo
By

वाशी, ता. ११ ( बातमीदार) : विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, याचे योग्य वेळी उत्तर देईन, असा इशारा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी दिला. न्यायालयाने घातलेल्या निर्बंधामुळे काही बोलणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले; तर नाईक हे पुन्हा सक्रिय झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे.
आमदार नाईक यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी नवी मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता प्रत्येक नोडमध्ये पालिकेचे रुग्णालय बांधावे, सीबीएसईच्या शाळा उभ्या कराव्यात, अशी मागणी केली. शहरातील पाणीटंचाई तातडीने दूर करावी, अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील नाईक यांनी दिला. याच बैठकीत माजी खासदार संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, माजी सभापती अनंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत व अन्य लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित होते.
नालेसफाई धारण तलावांची सफाई व्यवस्थित वेळेवर पूर्ण करावी. दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता डोंगर किनारी राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात. शाळा ऑफलाईन सुरू होणार असल्याने त्यांची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण याकडे लक्ष द्याावे. पावसाळ्यात नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल याची दक्षता घ्यावी. कोरोना लाटेची आशंका पाहाता प्रतिबंधात्मक उपाय योजावेत. महापालिकेचा आपत्कालीन मदत कक्ष कार्यान्वित करावा, अशा सूचना आमदार नाईक यांनी आयुक्‍तांना केल्‍या. यावेळी आरोग्‍य यंत्रणा सक्षम करण्‍याकडे लक्ष देण्‍याचे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.
चौकट
नवी मुंबईकरांना मालमत्ता कर माफी मिळालीच पाहिजे...
पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना संपूर्ण कर माफी देण्याबाबत आक्रमक भूमिका मांडत महापालिका प्रशासनाने तातडीने याबाबत सरकारच्या नगरविकास खात्याशी पत्रव्यवहार करून नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर माफीचा प्रस्तावदेखील मंजूर करून घ्यावा, अन्यथा याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा नाईक यांनी यावेळी दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81979 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top