
डोंबिवलीतून भारत गॅस कंपनीचे ९ सिलिंडर चोरीला
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्याने त्याची चोरी करण्यासही आता चोरट्यांनी सुरुवात केली आहे. डोंबिवलीत अशा दोन घटना समोर आल्या असून एका गॅस एजन्सीत काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयने चक्क ९ सिलिंडर चोरले आहेत; तर अन्य एका गॅस एजन्सीत काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयने २७ गॅस सिलिंडरची रोख रक्कम म्हणजेच २७ हजार रुपयांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्वेतील पेंढरकर कॉलेजजवळील एमआयडीसी फेज १ मध्ये जयशक्ती भारत गॅस व शिवशक्ती भारत गॅस एजन्सी आहेत. जयशक्ती एजन्सीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा हनुमान बिश्नोई हा ७ मे ला सकाळी १० च्या सुमारास गोडावूनमधील २५ भरलेले सिलिंडर घेऊन एकटाच कोळेगाव परिसरात डिलिव्हरीसाठी गेला. तेथून दुपारी परतल्यानंतर मॅनेजर लखन यांनी गाडी चेक केली असता त्यात ९ भरलेले सिलिंडर कमी आढळले. तसेच शिवशक्ती भारत गॅस गोडावूनमधून ९ मेला अशाच पद्धतीने श्रवण कुमार बिश्नोई हा डिलिव्हरी बॉय देसलेपाडा भागात डिलिव्हरीसाठी एकूण २७ भरलेले सिलिंडर घेऊन गेला होता. त्याने रिकामे २७ सिलिंडर गोडावूनमध्ये जमा करून त्याची रोख रक्कम २७ हजार रुपये व एका रेग्युलेटरची किंमत २९५ रुपये असा एकूण २७ हजार २९५ रुपयांची रोख रक्कम घेऊन पळून गेला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81980 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..