पं. शिवकुमार शर्मा अनंतात विलीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पं. शिवकुमार शर्मा अनंतात विलीन
पं. शिवकुमार शर्मा अनंतात विलीन

पं. शिवकुमार शर्मा अनंतात विलीन

sakal_logo
By

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. ११ ः प्रसिद्ध संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीमध्ये दुपारी दोनच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा राहुलने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी नातेवाईक, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह संगीत क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. दरम्यान, पं. शर्मा यांच्या अंत्यदर्शनासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, जावेद अख्तर, शबाना आजमी, झाकीर हुसेन, पं. सतीश व्यास यांच्यासह अनेक शिष्यगण उपस्थित होते.
पं. शिवकुमार शर्मा यांचे काल हृदयविकारामुळे त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी निधन झाले. आज सकाळी दहा वाजता त्यांचे पार्थिव जुहू येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. दुपारी दोनच्या सुमारास त्यांचे पार्थिव विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडला. त्यांना अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावलेले होते.
पं. शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या १३ व्या वर्षी संतूर शिकायला सुरुवात केली. संतूर हे जम्मू-काश्मीरचे लोकवाद्य. त्याला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून देण्याचे श्रेय पं. शिवकुमार यांना जाते. १९५५ मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूर वादनाचा पहिला भव्य कार्यक्रम मुंबईत सादर केला. यानंतर त्यांनी संतूरच्या तालावर संगीताच्या एका नव्या आवाजाची ओळख जगाला करून दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81981 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top