‘लीलावती’कडून पोलिसांत तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लीलावती’कडून पोलिसांत तक्रार
‘लीलावती’कडून पोलिसांत तक्रार

‘लीलावती’कडून पोलिसांत तक्रार

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ ः लीलावती रुग्णालयात नवनीत राणा यांच्या एमआरआय प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने विनापरवानगी छायाचित्रण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला. लीलावती रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने सांताक्रूझ पूर्व पोलिस ठाण्यात रवी राणा यांचा सुरक्षारक्षक आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली.
रवी राणा यांचा एक सुरक्षा रक्षक आणि पांढरा शर्ट घातलेल्या अज्ञात व्यक्तीने विनापरवानगी नवनीत राणा यांचे एमआरआय कक्षातील छायाचित्र काढले. तसेच हे छायाचित्र प्रसारमाध्यमांकडे आणि समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. लीलावती रुग्णालयाची स्वतःची नियमावली आहे, तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि धातूच्या वस्तू एमआरआय कक्षानजीक नेण्यास मनाई असते. तसे फलकही रुग्णालयात लावण्यात आले आहेत. या नियमांचा भंग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
---
सीसी टीव्ही फुटेज सुपूर्द
दरम्यान, परवानगीविना एमआरआय कक्षात फोटो काढल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. हा गुन्हा घडला त्यावेळचे सीसी टीव्ही चित्रीकरण पोलिसांना सादर करत असल्याचे सुरक्षा रक्षकाने तक्रारीत स्पष्ट केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81982 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top