गोवंडीतील २१५ झोपड्यांवर मुंबई महापालिकेचा हातोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवंडीतील २१५ झोपड्यांवर 
मुंबई महापालिकेचा हातोडा
गोवंडीतील २१५ झोपड्यांवर मुंबई महापालिकेचा हातोडा

गोवंडीतील २१५ झोपड्यांवर मुंबई महापालिकेचा हातोडा

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ ः मुंबई महापालिकेने गोवंडी परिसरातील एका खासगी जागेवर अतिक्रमण केलेल्या सुमारे २१५ झोपड्यांवर आज (ता. ११) तोडक कारवाई केली. मुंबई महापालिकेच्या एम/पूर्व विभाग हद्दीतील खासगी मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात झोपड्यांनी अतिक्रमण तक्रार महापालिकेकडे आली होती. त्यावर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत झोपडीधारकांना नोटीस बजावली होती.
दरम्यान, नोटीस मिळालेल्या रहिवाशांनी झोपड्यांवर कारवाई न होण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती; मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या निर्णयानंतर, महापालिकेतर्फे ३० एप्रिल २०२२ रोजी नोटीसधारकांना अंतिम आदेश पारित करण्यात आला. त्यानंतर आज सर्व २१५ झोपड्यांवर १० मे २०२२ रोजी हातोडा पाडण्यात आला. एम/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे यांच्या नेतृत्वात दोन जेसीबी आणि २० कामगारांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. गोवंडी पोलिसांनी यावेळ कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81983 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top