वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३८८३ बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३८८३ बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३८८३ बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३८८३ बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई

sakal_logo
By

नवी मुंबई, ता.११ (वार्ताहर): बेजबाबदारपणे रिक्षा चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात नवी मुंबई वाहतूक विभागाने ४ मे पासून विशेष मोहीम सुरू केली असून या मोहिमेंतर्गत वाहतूक पोलिसांनी ७ दिवसांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ३८८३ रिक्षा चालकांविरोधात कारवाई केली आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.
नवी मुंबई क्षेत्रात असलेले काही रिक्षा चालक हे वाहतुकीचे नियम न पाळता बेजबाबदारपणे रिक्षा चालवत असल्याचे वाहतूक विभागाच्या निदर्शनास आले होते. तसेच अनेक प्रवाशांनी बेजबाबदारपणे रिक्षा चालविणाऱ्यांविरोधात तक्रारी केल्याने नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातंर्गत कार्यरत असलेल्या १६ वाहतूक शाखांच्या वतीने रिक्षा युनियन, रिक्षा चालक-मालक यांच्यासोबत १४ डिसेंबर २०२१ रोजी बैठक घेऊन त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर देखील काही रिक्षा चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे रिक्षा चालवत असल्याचे आढळून आल्याने नवी मुंबई वाहतूक विभागाने त्यावेळी २८१७ बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात कारवाई केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81988 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top