चोर समजून जमावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोर समजून जमावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू
चोर समजून जमावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

चोर समजून जमावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर): चोर असल्याच्या संशयावरून सानपाडा गावातील काही तरुणांनी एका तरुणाला पकडून बेदम मारहाण केल्याने सदर तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर सानपाडा पोलिसांनी अज्ञात जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यापैकी ३ मारेकऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आता सीसी टीव्ही फुटेजच्या माध्यमातून इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील मृत तरुणाचे नाव ललित किसन गोयल (२५) असे असून तो नेरूळच्या शिरवणे गावात राहत होता. मंगळारी सायंकाळी ४ वाजण्‍याच्या सुमारास ललित हा सानपाडा गावात संशयास्पदरित्या फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर गावातील काही तरुणांनी संशयावरून त्याचा पाठलाग केला. त्यानंतर गावातील तरुणांनी त्याला गावदेवी मंदिराजवळ पकडून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच सानापाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत ललित गोयल हा अर्धमेला झाल्याने पोलिसांनी त्याला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना, ललित गोयल याचा मृत्यू झाला. ललितच्या मृत्यूनंतर सानपाडा पोलिसांनी ललितला मारहाण करणाऱ्या तरुणांची धरपकड करून त्यापैकी तिघांना अटक केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गावातील सीसी टीव्ही फुटेज ताब्यात घेऊन या प्रकरणातील इतर मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील आरोपी विरोधात कलम ३०४ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81991 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top