धाड टाकून ६ कोटी हडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धाड टाकून ६ कोटी हडपले
धाड टाकून ६ कोटी हडपले

धाड टाकून ६ कोटी हडपले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : खेळणी व्यापाऱ्याच्या घरी धाड टाकून ३० लाख जप्त करत नंतर त्यातील तब्बल ६ कोटी रुपये हडपणाऱ्या मुंब्रा पोलिस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांसह १० जणांना ठाणे पोलिस आयुक्तांनी निलंबित केले आहे. तसेच या प्रकरणी परिमंडळ एकच्या सहाय्यक आयुक्ताचीही चौकशी लावण्यात आली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून थेट गृहमंत्र्यांकडूनच आदेश आल्याने ठाणे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांनी ही कारवाई केली असून या सर्व प्रकरणामुळे ठाणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
ठाण्यातील मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी भागात राहणारे खेळण्यांचे व्यापारी कैजल मेमन यांच्या घरी ३० वेगवेगळ्या बॉक्समध्ये प्रत्येकी एक कोटी प्रमाणे ३० कोटी दडवून ठेवल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना १२ एप्रिल रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास मिळाली. या माहितीच्या आधारे मुंब्रा पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गीताराम शेवाळे यांनी पोलिस उप निरीक्षक हर्षद काळे, मदने यांच्यासह तीन साक्षीदारांना घेत मेमन यांच्या घरी धाड टाकली. याठिकाणी तब्बल ३० खेळण्यांच्या बॉक्समध्ये प्रत्येकी एक कोटी रुपये पोलिसांना आढळून आले. हे पैसे घेऊन मेमनसह पोलिसांचे पथक मुंब्रा पोलिस ठाण्यात आले. तपासाअंती त्यांनी पैशांचे ते बॉक्स फिर्यादीला परत दिले. मात्र त्यामधील सहा कोटी रुपये काढून घेण्यात आले होते.

तक्रारदाराला पैशांसाठी दमदाटी
हा काळा पैसा आहे, त्यातील अर्धी रक्कम आम्हाला दे, अशी पोलिसांनी दमदाटी केल्याचे तक्रारदार इब्राहिम शेख यांनी पोलिस आयुक्त जयजित सिंग यांना दिलेल्या अर्जात नमूद केले होते. मेमन यांनी पोलिसांना दोन कोटी देण्याचे कबूल केले. मात्र पोलिसांनी सहा बॉक्स स्वतःकडे ठेवून घेतले. यामध्ये प्रत्येकी एक कोटी रुपये होते. पोलिसांनी मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांच्या केबिनमध्ये हे सहा कोटी रुपये मोजून ठेवले. पोलिस ठाण्याच्या सीसी टीव्ही फुटेज तपासले असता हा प्रकार उघडकीस येईल, असा दावा अर्जदार इब्राहिम शेख याने केला होता.
गृहमंत्र्यांकडे धाव
राज्याचे गृहमंत्री, पोलिस महासंचालक, ठाण्याचे सह पोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त व कळवा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांना लेखी अर्ज करून मदतीची मागणी फैजल मेमन यांनी केली. त्यानंतर मुंब्रा पोलिस ठाण्यातील ३ अधिकारी आणि ७ कर्मचारी ठाणे पोलिसांनी निलंबित केले आहे.

निलंबित पोलिस
पोलिस निरीक्षक गीताराम शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक रवी मदने, हर्षल काळे, पोलिस नाईक पंकज गायकर, जगदिश गावीत, दिलीप किरपण, प्रवीण कुंभार, अंकुश वैद्य, ललित महाजन, निलेश साळुंखे अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81993 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top