भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर दुचाकीचे अनधिकृत पार्किंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर दुचाकीचे अनधिकृत पार्किंग
भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर दुचाकीचे अनधिकृत पार्किंग

भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर दुचाकीचे अनधिकृत पार्किंग

sakal_logo
By

भांडुप, ता. १२ (बातमीदार) ः भांडुप पूर्व रेल्वेस्थानकाबाहेरील तिकीटघर परिसरात अनधिकृतपणे मोटारसायकल उभ्या केल्या जात असल्यामुळे रेल्वे स्थानकामध्ये ये-जा करणाऱ्‍या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दररोज भांडुप पूर्व स्थानकावरून अन्य ठिकाणी प्रवास करणाऱ्‍या प्रवाशांची व नोकरदारवर्गाची संख्या अधिक आहे. पूर्व परिसरात एकच तिकीट घर असल्याने या ठिकाणी नागरिकांची सकाळच्या वेळेस गर्दी होत असते. भांडुप पूर्व परिसरात गाड्या पार्किंगला अधिकृत जागा नसल्याने तिकीट घर परिसरात मोठ्या प्रमाणावर दुचाकीचे पार्किंग केले जाते. रेल्वेस्थानकामध्ये जाण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81996 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top