ठाणे महापालिकेची प्रभाग रचना कायम राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thane Municipal Corporation
ठाणे महापालिकेची प्रभाग रचना कायम राहणार

ठाणे महापालिकेची प्रभाग रचना कायम राहणार

राज्य निवडणूक आयोगाने नुकताच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करीत प्रभाग रचना अंतिम करण्याची तारखादेखील निश्चित केल्या आहेत.

Ward structure of Thane Municipal Corporation will be continue pjp78

ठाणे महापालिकेची प्रभाग रचना कायम राहणार

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) नुकताच निवडणुकांचा (Election) कार्यक्रम जाहीर करीत प्रभाग रचना (Ward Structure) अंतिम करण्याची तारखादेखील निश्चित केल्या आहेत. असे असले तरी, ठाणे महापालिकेने (Thane Municipal) यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचनेवरील हरकती सूचना मागवून आयोगाकडे सादर केल्या आहेत. यामध्ये फारसे बदल न होता, प्रभाग रचना अंतिम करण्यात येईल, असे बोलले जात आहे. अशातच निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमामुळे आजी-माजी लोकप्रतिनिधींसह इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रभाग रचना, त्यानंतर त्यावर आलेल्या १९६० हरकती, सूचना घेऊन राज्य निवडणूक विभागाकडे सादर केल्या आहेत. त्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अशातच नुकताच निवडणूक आयोगाने पुन्हा निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार आता निवडणूक विभाग अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार आहे. त्यामुळे ही प्रभाग रचना कशी असेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर महापालिकेच्या निवडणूक विभागामार्फत मतदार याद्या अंतिम केल्या जाणार आहेत. त्यानंतर आरक्षण सोडत निघणार आहे.

तिकिटासाठी चुरस वाढली

महापालिकेत सत्तेस सहभागी होण्यासाठी ५० टक्के वाटा हा महिलांचा आहे. त्यामुळे या निवडणुकीतून ५० टक्के महिला पालिकेवर जाणार आहेत. मागील निवडणुकीचा विचार केल्यास चार सदस्यांचा एक प्रभाग असल्याने दोन पुरुष आणि दोन महिला असे आरक्षण पडले होते. त्यामुळे अनेकांना संधी उपलब्ध झाली होती. दरम्यान, आता पालिकेवर १४२ नगरसेवक निवडून जाणार आहेत; परंतु यंदा तीन सदस्यीय पद्धत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून तिकीट मिळवण्यासाठी चुरस वाढली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82000 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top