वडाळ्यातील नाल्यांत गाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडाळ्यातील नाल्यांत गाळ
वडाळ्यातील नाल्यांत गाळ

वडाळ्यातील नाल्यांत गाळ

sakal_logo
By

वडाळा, ता. १२ (बातमीदार) ः पावसाळा तोंडावर आला तरी वडाळा पूर्व येथील दिनबंधूनगर व संगमनगर नाला हे दोन्ही मोठे नाले अजूनही गाळातच असल्याचे चित्र आहे. मनसे वडाळा विधानसभा विभागप्रमुख आनंद प्रभू यांनी या नाल्यांची बुधवारी (ता.११) पाहणी केली असता या दोन्ही नाल्यांची साफसफाई अद्याप झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळ्यात वडाळा पूर्व परिसर जलमय होण्याची दाट शक्यता असल्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
वडाळा पूर्व परिसर हा मुंबईतील अतिसखल भागात आहे. येथील दिनबंधूनगर, संगमनगर, गणेशनगर, शिवशंकरनगर, चिखलवाडी, आझाद मोहल्ला, शांतिनगर आदी भागांत मिळून साधारण एक लाखाहून अधिक लोकवस्ती आहे. येथील भागातील छोटे-छोटे नाले हे दिनबंधूनगर व संगम नगर या मोठ्या नाल्यांना जोडलेले आहेत. त्यामुळे या नाल्यांची योग्य सफाई पालिकेच्या कामगारांनी केल्यास नाल्यालगतच्या लोकवस्त्यांमध्ये पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही. नाल्यातील गाळ न काढताच येथील नालेसफाई करण्यात येत असल्याने पावसाळ्यात समुद्राला भरती आल्यास नाल्यालगतच्या लोकवस्तीतील घरांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका कायम असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांनी नालेसफाईदरम्यान नाल्यातील संपूर्ण गाळ बाहेर काढूनच नालेसफाई करावी, अशी मागणी येथील स्थानिकांमधून जोर धरू लागली आहे.
साधारण ८ जूनपासून मुंबईत पाऊस येणे अपेक्षित असते. तत्पूर्वी वडाळ्यातील मुख्य नाल्यांची साफ सफाई झाली नाही तर वडाळा पूर्व परिसर जलमय होण्याची शक्यता मनसे वडाळा विभागप्रमुख आनंद प्रभू यांनी व्यक्त केली असून नाल्याची सफाई लवकरत लवकर करण्यात यावी, यासाठी एफ उत्तर विभाग सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे, असे प्रभू यांनी सांगितले.
...
कारवाई करण्याचे निर्देश
कनिष्ठ अभियंता स्वनिल कोहळे मुंबई शहर यांना सदर ठिकाणी तत्काळ पाहणी करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे महानगरपालिका एफ उत्तर विभाग सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी सांगितले.
...
व्हिडीओ चित्रीकरण करा!
नालेसफाईदरम्यान ठेकेदार व त्यांची काही माणसे नाल्यात उतरवून ते फोटो पालिका अधिकाऱ्यांना व्हाट्सॲपवर पाठवून आपली बिले पास करून घेतात. त्यापेक्षा ज्या ठिकाणी नालेसफाई सुरू आहे त्याचे रोजचे व्हिडीओ चित्रीकरण केले पाहिजे. अथवा पालिका अधिकाऱ्यांनी वेळच्या वेळी संबंधित ठिकाणची पाहणी केल्यास नालेसफाईच्या कामात कामचुकारपणा होणार नाही, असे मनसे शाखा अध्यक्ष वडाळा संजय रणदिवे यांचे म्हणणे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82005 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top