
जोतिबा फुले ‘महात्मा’ दिन साजरा
धारावी, ता. ११ (बातमीदार) : महात्मा जोतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी ११ मे १८८८ साली बहाल करण्यात आली होती. त्याला बुधवारी (ता. ११) १३४ वर्षे झाली. त्यानिमित्ताने जेथे ही पदवी बहाल केली त्याच ठिकाणी म्हणजे मशीद बंदर, मांडवी कोळीवाडा येथील मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्था येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नारायण मेघाजी लोखंडे यांचे पणतू गोपीनाथ वसंत लोखंडे यांचा या दिवसाचे औचित्य साधून सुरेश ढोबळे यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आनंदा ओव्हाळ यांनी भारतीय संविधान व अन्य वैचारिक पुस्तके भेट दिली. या वेळी मराठा ज्ञाती धर्म संस्थेचे सचिव सुरेश ढोबळे, व्यवस्थापक लक्ष्मण खामकर, प्रमिला जाधव, नीलेश डोंगरे, राजेश कोंबेकर, अली सिमेंटवाला, इब्राहिम मोतीवाला, इंडियन्स सोशल मोव्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष आनंदा होवाल, दीपक दिपणकार, संदीप कारंडे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82009 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..