
विद्यार्थ्यांना पॉक्सो कायद्याचे धडे
नेरूळ, ता. १२ (बातमीदार) : लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा म्हणजेच पॉक्सो कायद्याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, तसेच या कायद्याची जागरूकता वाढविण्यासाठी फाईट बँक फाऊंडेशनच्या माध्यमातून वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शहरातील पालिकेसह विविध खाजगी शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते.
पॉक्सो कायदा काय आहे, याबाबत विद्यार्थ्यांसह उपस्थितांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी जिद्द या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कोरियोग्राफर गीता कपूर यांनी आपल्या मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालविणे गरजेचे असल्याचे सांगितले. फाईट बँक फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुनेत्रा पालवे यांनी पॉक्सो कायद्याबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला. पालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त जयदीप पवार यांच्या मदतीने विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी कृष्णा ठक्कर, स्नेहा काला, डॉ. अर्चना अरुण पालव, रोनाल्ड डिसूजा, जिग्नेश दवडा, अमरदीप सिंग, राजेंद्र सरोज आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82012 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..