पालिका रुग्णालयातील समस्या दूर करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिका रुग्णालयातील समस्या दूर करण्याची मागणी
पालिका रुग्णालयातील समस्या दूर करण्याची मागणी

पालिका रुग्णालयातील समस्या दूर करण्याची मागणी

sakal_logo
By

तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : ऐरोलीतील महापालिकेच्या रुग्णालयातील डायलिसिस केंद्रातील समस्या दूर करण्याची मागणी ‘आप''कडून करण्यात आली आहे. ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डायलिसिस विभागात आवश्‍यक सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. या रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा फायदा चांगला मिळावा, यासाठी डायलिसिस केंद्रामधील आवश्यक तरतुदींची पूर्तता करण्यात यावी, यासाठी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा राठोड यांच्याकडे ‘आप''च्या जिल्हा उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर यांनी शिष्टमंडळासह भेट घेत त्यांना लेखी निवेदन दिले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मिलिंद तांबे, निवृत्त कामगार आयुक्त आणि आप नवी मुंबई जिल्हा मुख्य समन्वयक देवराम सूर्यवंशी, नामदेव साबळे, आरती सोनावणे, सतीश गवळी आदी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांकडून दखल घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82020 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top