
तब्येत धडधाकट तरच त्वचा खुलते
मुंबई, ता. १२ ः आपली त्वचा खुलून दिसायला हवी असेल तर त्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. पोषक आहार, व्यवस्थित व्यायाम, पुरेशी विश्रांती, चांगली लाईफस्टाईल या सर्व गोष्टी त्यासाठी आवश्यक असल्याचे मत आहारतज्ज्ञ व त्वचातज्ज्ञांनी आज येथे एका परिसंवादात व्यक्त केले.
सौंदर्य खुलविण्यासाठी नैसर्गिक उपाय या विषयावर आल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियातर्फे आयोजित परिसंवादात त्वचेसाठी उपयुक्त टिप्स देण्यात आल्या. झोपेत आपल्या त्वचेचा कायापालट होतो. त्यामुळे रात्रीची जागरणे टाळा. कोणतीही थेरेपी वापरली तरी तिचे त्वचेवरील चांगले परिणाम दिसण्यासाठी २८ दिवस लागतात. दही, ताक त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले आहे, मात्र दुधाच्या शुद्धतेबाबत खात्री करून घ्यावी, अन्यथा त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. ग्लूटेन असलेले पदार्थ, सोडा, अरबट चरबट खाणे शक्यतो टाळा. आपल्या त्वचेवर तेल, घाम, प्रदूषण, धूलिकण चिकटलेले असतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ धुवा, असे त्वचाविकारतज्ज्ञ गीतिका मित्तल म्हणाल्या.
तुमची प्रकृती आतून उत्तम असेल तरच तुमची त्वचा बाहेरून चांगली दिसेल. त्यासाठी योग्य आहार, व्यायाम, भरपूर पाणी पिणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्वचेच्या शेवटच्या टोकापर्यंत व्यवस्थित रक्तपुरवठा झाला तरच त्वचेला ऑक्सिजन मिळतो. प्रदूषित हवा, धूम्रपान त्वचेसाठी अत्यंत वाईट आहे. आपण जे खातो त्याचा त्वचेवर मोठा परिणाम होतो. ई जीवनसत्त्व असलेले अन्न, बदाम, स्थानिक आणि हंगामी फळेही जरूर खा.
...
बदाम खाण्याचा सल्ला
बदाम रोज वीस तरी खाल्ले पाहिजेत. सकाळी उठून बदाम खाण्यापेक्षा साडेअकरा वाजता आपल्याला भूक लागते तेव्हा खाल्ले तरी चालतील किंवा रात्री सात आठ वाजता घरी परत येताना खाल्ले तरीही चालतील. बदाम भिजवून ठेवले तर जरूर फायदा होतो आणि त्यातून बी कॉम्प्लेक्सही मिळते, मात्र ते न भिजवता खाल्ले तरीही चालतील, मात्र त्याचे साल काढू नका, त्यात अत्यंत आवश्यक असे फायबर असते, असे आहारतज्ज्ञ ऋतिका समादार यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82031 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..