मिरा-भाईदर पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईदर पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद
मिरा-भाईदर पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद

मिरा-भाईदर पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद

sakal_logo
By

भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : मिरा-भाईंदर पालिकेच्या विकासकामांचे उद्‌घाटन आणि त्यासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद हे समीकरणच झाले आहे. येत्या १६ मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत असलेल्या विकासकामांच्या उद्‌घाटन कार्यक्रम पत्रिकेवरूनही असाच वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाच्या पालिकेने तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेवर महापौरांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ही पत्रिका बदलली नाही तर आपण स्वतंत्र निमंत्रण पत्रिका काढू, असा इशारा महापौरांनी दिला आहे. कार्यक्रमाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना हा वाद उफाळून आला आहे.
महापालिकेने बांधलेल्या बुद्ध विहार, तरण तलाव, अग्निशमन दलाच्या ताफ्यात समाविष्ट झालेले अत्याधुनिक वाहन यांच्या लोकार्पणासह आणि बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांना घरांच्या किल्ल्यांचे वाटप १६ मे रोजी करण्यात येणार आहे. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून कार्यक्रमाचे निमंत्रण देखील दिले आहे. मात्र या कार्यक्रमाच्या प्रशासनाने तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद उफाळला आहे. निमंत्रण पत्रिकेत ज्या व्यक्तीच्या हस्ते उद्‌घाटन व्हायचे आहे त्या व्यक्तीचे नाव सर्वात वर असते आणि पत्रिकेवर निमंत्रक म्हणून महापौरांचे नाव असते.
पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत मात्र प्रशासनाने उद्‌घाटक म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची नावे समाविष्ट केली आहेत. तसेच उद्‌घाटकाचे नाव सर्वात वर असणे आवश्यक असताना, ते केंद्रीय मंत्र्यांच्या नावाच्या खाली लिहिण्यात आले आहे. याशिवाय पत्रिकेत निमंत्रक म्हणून आयुक्त दिलीप ढोले यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे महापौर ज्योत्स्ना हसनाळे संतप्त झाल्या आहेत.

उद्‌घाटक म्हणून केवळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव देणे आणि ते देखील सर्वात वर लिहिणे आवश्यक होते. शिवाय कार्यक्रमासाठी सर्व मान्यवरांना निमंत्रण महापौर देणार असल्यामुळे पत्रिकेत निमंत्रक म्हणून महापौरांचेच नाव असायला हवे. प्रशासनाने तयार केलेली निमंत्रण पत्रिका तातडीने बदलावी. अन्यथा राजशिष्टाचाराचे संपूर्ण पालन करून आपण स्वत:ची निमंत्रण पत्रिका छापू.
- ज्योत्स्ना हसनाळे, महापौर.

राजशिष्टाचारानुसार निमंत्रण पत्रिका तयार करून ती जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासून घेण्यात आली आहे. त्यात काही त्रुटी असतील तर त्या तपासून योग्य त्या सुधारणा केल्या जातील.
- दिलीप ढोले, आयुक्त.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82035 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top