‘पिंक बॉक्स’ उपक्रम राज्यभर राबवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पिंक बॉक्स’ उपक्रम राज्यभर राबवणार
‘पिंक बॉक्स’ उपक्रम राज्यभर राबवणार

‘पिंक बॉक्स’ उपक्रम राज्यभर राबवणार

sakal_logo
By

पालघर, ता. १२ (बातमीदार) ः राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयाच्या आवारामध्ये पिंक बॉक्स उपक्रम सुरू करणार आहोत. या पिंक बॉक्समध्ये लेखी स्वरूपात विद्यार्थिनी तक्रार देऊ शकतात. त्या तक्रारी संबंधित पोलिस विभागाकडून व राज्याच्या महिला आयोग सदस्यांमार्फत काम करण्यात येईल. बीट मार्शल, निर्भया पथक या सगळ्यांच्या सहकार्याने तक्रारीचे निवारण होईल, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली. यावेळी आमदार सुनील भुसारा उपस्थित होते.
पुण्यामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला होता. त्यास विद्यार्थीवर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे हा प्रोजेक्ट संपूर्ण राज्यात राबवणार असल्याचे रूपाली चाकणकर म्हणाल्या. ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील तक्रारीच्या जनसुनावणीसाठी चाकणकर बुधवारी पालघर येथे आल्या होत्या. त्या वेळेस त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भरोसा सेलमार्फत कौटुंबिक प्रश्न सोडवण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत. कोणतीही कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार आली तर ती पोलिस स्टेशनला न देता भरोसा सेलला देण्यात यावी, अशा प्रकारचे आदेश देण्यात आले असून जेणेकरून भरोसा सेल तक्रारदार व्यक्तींची समपुदेशन करण्यात यावी. त्यामुळे योग्य मार्ग निघाल्यास ते कुटुंब वेगळे होण्यापासून वाचू शकेल, असा आमचा प्रयत्न आहे, असे चाकणकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82039 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top