क्रिकेट स्पर्धेत चॅम्पियन संघाला विजेतेपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिकेट स्पर्धेत चॅम्पियन संघाला विजेतेपद
क्रिकेट स्पर्धेत चॅम्पियन संघाला विजेतेपद

क्रिकेट स्पर्धेत चॅम्पियन संघाला विजेतेपद

sakal_logo
By

वसई, ता. १२ (बातमीदार) ः विलास विचारे व दिलीप पाटणकर सिझन क्रिकेट स्पर्धेत चॅम्पियन संघाने चक्रधर सी सी. या संघावर मात करत चषक पटकावला. नालासोपारा येथील शूर्पारक मैदानावर पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात एकूण २० संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात चॅम्पियन संघाचा डावखुरा फलंदाज सुमीत ढेकाळे यांनी २५ चेंडूत शतक झळकावले. अत्यंत चुरशीच्या सामन्यात निर्मळ क्रिकेट क्लब उपविजेता ठरला.
याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, माजी रणजीपटू किसन वाळींजकर, जयप्रकाश राऊत, विकास विचारे यांच्या हस्ते विजेत्यांना चषक देण्यात आले. यावेळी प्रास्ताविक कुमार राऊत; तर सूत्रसंचालन मोहक पाटील यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82040 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top