पाणी प्रश्‍न न सोडवल्‍यास सिडकोच्या कार्यालय ताब्‍यात घेऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी प्रश्‍न न सोडवल्‍यास सिडकोच्या कार्यालय ताब्‍यात घेऊ
पाणी प्रश्‍न न सोडवल्‍यास सिडकोच्या कार्यालय ताब्‍यात घेऊ

पाणी प्रश्‍न न सोडवल्‍यास सिडकोच्या कार्यालय ताब्‍यात घेऊ

sakal_logo
By

पनवेल, ता. १२ (बातमीदार) : गेल्‍या काही महिन्यांपासून पनवेलसह कामोठे, खारघर, तळोजा, रोडपाली वसाहतीला पाणीटंचाई भेडसावत आहे. याप्रकरणी नागरिकांनी अनेक मोर्चे, निवेदने सादर केली आहेत, मात्र तरीही समस्‍या न सुटल्‍याने भाजपच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मानसरोवर रेल्वेस्‍थानकाजवळ सुरू असलेले सिडकोचे काम बंद करून आंदोलन करण्यात आले. या वेळी काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी अडवल्यावर सिडकोचे कार्यकारी अभियंता एन. जे. चौथानी यांना निवेदन देण्यात आले. ३१ मे पर्यंत व्यवस्थित पाणी न मिळाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता सिडकोच्या कार्यालयाचा ताबा घेऊ, असा इशाराही यावेळी ठाकूर यांनी दिली.
कामोठे येथील पाण्याच्या समस्येबाबत सिडकोला जाग आणण्यासाठी भाजपने गुरुवारी मानसरोवर रेल्वेस्‍थानकाजवळ काम बंद आंदोलन करण्यात आले. यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर, उपमहापौर सीता पाटील, स्थायी समिती अध्यक्ष नरेश पाटील, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका संतोषी तुपे, हेमलता गोवारी, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, के. के. म्हात्रे, काकासाहेब कुत्तरवडे आदी उपस्थित होते.
सिडकोला नागरिकांच्या समस्‍यांचे देणे-घेणे नाही. त्यामुळे सगळ्यांना कडक उन्हात आंदोलन करावे लागत आहे. कामोठे परिसरात ४२ एमएलडी पाण्याची गरज असताना ३५ एमएलडी पाणी पुरवले जात आहे, मग नवीन तयार होणाऱ्या इमारतींतील रहिवाशांना पाणी कसे देणार, असा प्रश्‍न यावेळी ठाकूर यांनी उपस्‍थित केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82044 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top