सोनसाखळी खेचून पळणाऱ्याला पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनसाखळी खेचून पळणाऱ्याला पकडले
सोनसाखळी खेचून पळणाऱ्याला पकडले

सोनसाखळी खेचून पळणाऱ्याला पकडले

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १२ ः डोंबिवली पश्चिमेतील कोपर रस्त्यावर शतपावली करणाऱ्या एका व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरट्याने पळ काढला; परंतु जागरूक नागरिकांनी आरडाओरडा करीत त्याला पकडले. तेवढ्यात समोरून विष्णूनगर पोलिस पेट्रोलिंगसाठी आले असता नागरिकांनी चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अक्षय धोत्रे (वय २२) अशी सोनसाखळी चोरणाऱ्याचे नाव आहे. पोलिसांना त्याच्याकडे सोनसाखळी तसेच एक चोरीचा मोबाईल सापडला आहे. तसेच त्याने यापूर्वी केलेल्या तीन गुन्ह्यांची उकलसुद्धा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
डोंबिवली पश्चिमेत राहणारे विनोद शर्मा (४९) हे बुधवारी रात्री ११ च्या सुमारास शतपावली करत होते. याच दरम्यान अक्षयने त्यांच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन खेचून पळ काढला. विनोद यांनी चोर-चोर असा आरडाओरडा करताच परिसरातील जागरूक नागरिकांनी चोरास पकडले. याच वेळी पेट्रोलिंग करणाऱ्या विष्णूनगर पोलिसांची गाडी तेथे आली असता, नागरिकांनी अक्षयला पोलिसांच्या ताब्यात दिले. अक्षयच्या खिशात विनोद यांची ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन व ७ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोबाईलविषयी अक्षयला विचारणा केली असता, त्याने सुरुवातीला काही प्रतिसाद दिला नाही. मात्र नंतर मोबाईलदेखील चोरीचा असल्याचे तपासाच निष्पन्न झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82049 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top