कोरोना काळातच रक्ताचा अधिक अपव्यय, आकडेवारी आली समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना काळातच रक्ताचा अधिक अपव्यय
कोरोना काळातच रक्ताचा अधिक अपव्यय

कोरोना काळातच रक्ताचा अधिक अपव्यय, आकडेवारी आली समोर

मुंबई : कोरोना काळाची दोन वर्षे सर्वांसाठी नुकसानकारक ठरली. याच काळात राज्यामध्ये रक्ताचा सर्वाधिक अपव्ययही झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. मुंबईतही गेल्या पाच वर्षांत एकूण चार हजार ७४२ युनिट्स रक्त वाया गेले; तर २०१९ आणि २०२० म्हणजे कोरोना काळ सुरू असतानाच सर्वाधिक म्हणजे दोन वर्षांचे मिळून दोन हजार ६३१ युनिट्स रक्त वाया गेल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मागवलेल्या माहितीतून मिळाली.

उन्हाळी सुटी लागल्यावर शहरांमध्ये रक्ताचा तुटवडा नेहमी जाणवतो. अशा वेळी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून रक्तदानाचे आवाहन करण्यात येते. शिबिरातून होणाऱ्या रक्तदानातून हा तुटवडा भरून काढला जातो. दरम्यान, मुंबईत ५५ रक्तपेढ्या असून यातील सरकारी रक्तपेढ्या तसेच पालिकेच्या प्रमुख रक्तपेढ्यांमधील रक्तही वाया गेल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या केईएम, कूपर, सायन, नायर, भाभा, राजावाडी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय रक्तपेढीतील रक्त वाया गेले. राज्य सरकारी विभागातील सेंट जॉर्ज, जे. जे. महानगर रक्तपेढी, कामा आदी रक्तपेढ्यांच्याही रक्ताचा अपव्यय झाला आहे. रक्त ठराविक तापमानाला साठवले जात असून ठराविक कालावधीत न वापरल्यास ते वाया जात असल्याचे रक्तपेढीच्या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, रक्त क्षमतेपेक्षा अधिक साठवले गेल्यास रक्त वितरणाचे नियोजन करणेही आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

रक्त वाया जाण्याचे प्रकार रोखण्यासाठी रक्तपेढ्यांचे सुयोग्य नियोजन गरजेचे आहे. गरजेनुसार रक्तदान शिबिरे राबवली गेली पाहिजेत. अतिरिक्त रक्त असेल, तर दुसऱ्या रक्तपेढ्यांना ते दिले पाहिजे. ‘फर्स्ट इन फर्स्ट आऊट’ या पद्धतीने रक्ताचा वापर केला पाहिजे. रक्तपेढ्यांनी मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यरत असणेही महत्त्वाचे आहे.
- डॉ. अरुण थोरात, सहसंचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद

राज्यातील वर्षनिहाय आढावा
वर्ष रक्ताचा अपव्यय
२०१७ ६२९ युनिट्स
२०१८ ६२७ युनिट्स
२०१९ १३१० युनिट्स
२०२० १३२१ युनिट्स
२०२१ ८५५ युनिट्स

मुंबईतील रक्ताचे अपव्यय
वर्ष केईएम कूपर सायन नायर भाभा राजावाडी डॉ. आंबेडकर
२०१७ ०० ७८ ५० ०६ ३८ १८ ९१
२०१८ ०० ४९ ७८ ३० २६ ३९ १६
२०१९ ०० १५० ५७ २६ ३२ ११६ ४३
२०२० ०० ६४ २६ १४४ ४३ १६५ ९०
२०२१ ०२ ३७ ०८ ०२ ७२ ६५ ९०

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82059 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top