
‘बियाणे खरेदीवेळी काळजी घ्यावी’
अलिबाग, ता. १२ : खरीप हंगामाला सुरुवात होणार असल्याने विविध कंपन्यांचे बियाणे कृषी सेवा केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. आपली फसवणूक आणि नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीला प्राधान्य द्यावे. बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करावी. पावती व बियाण्यांचा संपूर्ण तपशील (जसे पीक, बाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव इत्यादी) नमूद करावे. रोख किंवा उधारीची पावती घ्यावी. खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकिटे सील बंद, मोहर बंद असल्याची खात्री करावी. बियाणे पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्यावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास, अथवा इतर तक्रारींसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन अलिबाग उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82060 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..