कंत्राटदारांना नालेसफाईचा अल्टिमेटम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंत्राटदारांना नालेसफाईचा अल्टिमेटम
कंत्राटदारांना नालेसफाईचा अल्टिमेटम

कंत्राटदारांना नालेसफाईचा अल्टिमेटम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा,

ठाणे, ता. १२ : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केलेल्या नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यात काही ठिकाणी कामे संथगतीने सुरू असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे १५ मेपर्यंत ५० टक्के नालेसफाई होणार नाही, त्या कंत्राटदारांना पालिकेकडून कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जाणार आहेत. तरीही ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह कंत्राट रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ही कामे ३१ मेपर्यंत १०० टक्के पूर्ण करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत.
शहरात दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. यंदा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. पालिका क्षेत्रात मुख्य नाले आणि त्यास जोडणारी लहान-मोठे असे एकूण ३०० किलोमीटर लांबीचे नाले आहेत. या नालेसफाईच्या कामांचा आयुक्तांनी बुधवारी (ता. ११) आढावा घेतला. यावेळी शहरात ४० ते ५० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करत उर्वरित नालेसफाईची कामे प्राधान्याने वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी घनकचरा विभागास दिले. दरम्यान, काही ठिकाणी ही कामे संथगतीने सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने कंत्राटदारांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

सर्वच कंत्राटदारांना १५ मेपर्यंत ५० टक्के तर ३१ मेपर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे काम झालेले नसल्याचे आढळून आल्यास त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जाणार आहेत. स्पष्टीकरणानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. - मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे पालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82063 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top