राकेश शेट्टी यांची प्रवक्तापदी नेमणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राकेश शेट्टी यांची प्रवक्तापदी नेमणूक
राकेश शेट्टी यांची प्रवक्तापदी नेमणूक

राकेश शेट्टी यांची प्रवक्तापदी नेमणूक

sakal_logo
By

मुलुंड, ता. १२ (बातमीदार) ः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुलुंडचे काँग्रेस नेते राकेश शेट्टी यांची काँग्रेस पक्ष प्रवक्तापदी नेमणूक केली आहे. राकेश शेट्टी हे सध्या अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय जॉइंट सेक्रेटरी आहेत. तसेच ते गुजरात राज्याचे प्रभारीदेखील आहेत. त्याअगोदर ते गोव्याचे काँग्रेस पक्षाचे इनचार्जदेखील होते. इंटक (इंडियन नॅशनल ट्रेंड युनियन काँग्रेस) या संस्थेचे उपाध्यक्षपददेखील ते सांभाळत आहेत. महावितरणमध्ये तब्बल १०,००० कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी चळवळ उभी केली होती. गोव्यामध्ये त्यांनी सेव्ह मांडवी रिव्हर आंदोलनदेखील यशस्वी केले. त्यांच्या नियुक्तीनंतर विविध स्तरांवरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82064 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top