प्रवासी मजुरांसाठी सेवावाहन सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवासी मजुरांसाठी सेवावाहन सुविधा
प्रवासी मजुरांसाठी सेवावाहन सुविधा

प्रवासी मजुरांसाठी सेवावाहन सुविधा

sakal_logo
By

मालाड, ता. १२ (बातमीदार) ः बोरिवलीत जन साहस फाऊंडेशनच्या वतीने प्रवासी मजुरांच्या मदतीकरिता सेवावाहन सुविधेचे नुकतेच उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी अमरीन शेख, सुमित चव्हाण उपस्थित होते.
या वाहनाच्या माध्यमातून अनेक राज्यांतून मुंबईत प्रवास करत आलेल्या मजुरांचे ई-श्रम कार्ड बनवणे, आधार कार्ड अपडेट करणे, तसेच इतर शासकीय कागदपत्रे बनवणे असे काम जिथे प्रवासी मजूर काम करत आहेत त्या ठिकाणी केले जाणार आहे. या मजुरांचे स्वास्थ्य ठीक राहावे यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजनातही या सेवा वाहनाचा उपयोग होणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. तसेच आतापर्यंत संस्थेच्या वतीने ३०० मजुरांचे श्रम कार्ड बनवून देण्यात आले. तसेच ५०० प्रवासी मजुरांना श्रम विभागाच्या माध्यमातून दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली. प्रवासी मजुरांना वेतन मिळत नसेल किंवा मालक इतर कोणत्याही प्रकारे त्रास देत असेल तर १८००२०००२११ या हेल्पलाईन क्रमांकावर प्रवासी मजूर मदतीसाठी २४ तास संपर्क करू शकतात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82069 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top