बियाणे खरेदी करण्यापूर्वी काळजी घ्यावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बियाणे खरेदी करण्यापूर्वी काळजी घ्यावी
बियाणे खरेदी करण्यापूर्वी काळजी घ्यावी

बियाणे खरेदी करण्यापूर्वी काळजी घ्यावी

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. १४ (वार्ताहर) : लवकरच खरीप हंगामाची सुरुवात होत आहे. कंपन्यांचे विविध प्रकारचे बियाणे कृषी सेवा केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. आपली फसवणूक व नुकसान होऊ नये, याकरिता शेतकरी बांधवांनी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.

गुणवता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदीस प्राधान्य द्यावे. बनावट भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करावी. पावती व बियाण्यांचा संपूर्ण तपशील नमूद करावा, तसेच रोख किंवा उधारीची पावती घ्यावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टण, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्याची पाकिटे सीलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्यावी. शेतकऱ्यांनी बियाण्यांच्या तक्रारीबाबत पेरणी केल्यापासून १० दिवसांच्या आत आपल्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ईश्वर चौधरी यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82075 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top