अंबरनाथमधील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथमधील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी होणार
अंबरनाथमधील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी होणार

अंबरनाथमधील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी होणार

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १२ (बातमीदार) ः अंबरनाथ शहरातील नालेसफाईचे काम पावसाळ्यापूर्वी होणार असून त्यादृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील १५ लहान आणि सात मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी निविदा प्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठी ३२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नालेसफाई ठेका पद्धतीने केली जाणार आहे. या कामासाठी १२ मेपासून निविदा मागवण्यात आल्या असून निविदा स्वीकारण्याची अंतिम मुदत २६ मे आहे. २७ मे २०२२ रोजी निविदा उघडल्या जाणार आहेत. त्यानंतर मान्सून सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.
मागील काही वर्षांपासून नालेसफाई कामाची निविदा मागवण्यात आल्या नसल्याने ऐन पावसाळ्यात नालेसफाईच्या कामाचा मुहूर्त लागत होता. यंदा मात्र पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. बी केबिन रस्ता आणि स्टेट बॅंकेसमोरील नाला अरुंद असल्याने काही ठिकाणी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना त्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. स्टेट बँकेच्या समोर असलेला नाला रुंद करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचणार नाही, असा विश्वास प्रशासनातर्फे व्यक्त केला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82077 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top