कळंबोलीतून वयोवृद्‍ध व्यक्ती बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबोलीतून वयोवृद्‍ध व्यक्ती बेपत्ता
कळंबोलीतून वयोवृद्‍ध व्यक्ती बेपत्ता

कळंबोलीतून वयोवृद्‍ध व्यक्ती बेपत्ता

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : कळंबोलीच्या रोडपाली भागात राहणारे हिरालाल रामकृष्ण बाविस्कर (वय ७३) हे बेपत्ता आहेत. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. हिरालाल हे २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ते फिरण्यासाठी घरातून बाहेर पडले होते; मात्र ते त्यानंतर घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा परिसरात, रुग्णालयात, नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांची काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाने २७ एप्रिल रोजी कळंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांचा वर्ण सावळा असून त्यांची उंची ५ फूट ३ इंच इतकी आहे. त्यांच्या अंगात काळ्या रंगाची पॅन्ट व पिवळ्या रंगाचा फूल शर्ट असून या वर्णनाचा कुणी व्यक्ती आढळून आल्यास त्याबाबतची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82078 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top